Sunday 21 May 2023

मार्च-एप्रिल-मे २०२३ : सीड बॉल्स अर्थात बीजगोळ्यांची निर्मिती



 

नमस्कार ! 

ग्लोबल  वॉर्मिंग आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम बघता, आपलय पृथ्वीची अवसतः  किती नाजुक झालीये हे आपल्याला माहितीच आहे ! म्हणूनच, आपल्याला शक्य असणारे कार्य करतानाच पुढच्या पिढीला त्याबाबत जागरूक करणेही आपलेच काम !   घरात आपण पालकांनी,  पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जगामध्ये काय उपक्रम चालू आहेत या संबंधित, मुलांशी  गप्पा मारलय पाहिजेत ! वेगवेगळे विषय आणि उपक्रम त्यांच्यासमोर मांडले पाहिजेत ! जसे की पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करून कापडी पिशवी वापरणे, माती हवा व पाणी यांचे प्रदूषण करणारे इलेक्ट्रॉनिक वेस्ट हे नेहमीच्या कचऱ्यात न टाकता त्याचा पर्यावरण  पूरक पद्धतीने विल्हेवाट करणाऱ्या संस्थांना देणे आणि हरित पृथ्वीच्या दृष्टीने सीड बॉल्स अर्थात बीजगोळ्यांची निर्मिती करणे  करणे इत्यादी. 

मुलांनाही,  मातीत रमायला आवडतेच ! म्हणून मार्च-एप्रिल-मे  २०२३ या महिन्यांमध्ये आपल्या छोट्या खारींना, सीड बॉल्स अर्थात बियांचे गोळे करण्याविषयी माहिती दिली. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरात आंबे, जांभूळ,फणस  अशी कितीतरी फळे आणली  जातात ज्यातून निघणाऱ्या बियांचे, कोयींचे बॉल्स कसे करावे याविषयी पालकांनी खारींना सांगितले  आणि मुले लागली कामाला !  माती, खत आणि बिया एकत्र करून त्यांनी  विविध फळांचे बीज गोळे तयार केलेत. आणि आता खारी पावसाळ्याची वाट बघत आहेत  !  जरा दमदार पाऊस होऊन गेला की त्यांच्या पावसाळी भटकंतीत हे बीज गोळे डोंगरदर्‍यांमध्ये टाकणार आहेत.  त्यातून नक्कीच काही रोपे तरारतील,वाढतील.  मातीत खेळायला मिळाल्यामुळे, वृक्षारोपणाचा हा सोपा आणि धमाल मार्ग खारींना खूप आवडला. 


या उपक्रमात पुढील खारींनी  सगभाग घेतला !  सारा, ज्ञानश्री, राधा, ओवी, शार्वी आणि शमीक !

      

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सहज करता  येण्यासारखे कितीतरी सोपे उपक्रम आहेत. अगदी एक एकट्याने जरी या युक्त्यांचा वापर केला तरी आपल्या धरती मातेच्या संरक्षणार्थ आपण काहीतरी मोलाची भर नक्कीच घालू शकतो. 

खारीचा वाटा उचलण्यासाठी तुमचेही स्वागत आहे !  आमचा whastaap ग्रुप जिथे सर्व उपक्रमांची माहिती, आवाहन असते , तो जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वापरा : https://chat.whatsapp.com/Lk73anpEzhHCkcvL1nwutE