Thursday 23 February 2023

ई-यंत्रण: ई-कचरा संकलन मोहीम

 

२६ जानेवारी २०२३ !! आजच्या टेक्नो-सॅव्ही जगात,इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल आणि स्मार्ट गॅझेट्सचा वापर आणि खप  प्रचंड प्रमाणात वाढला असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वेस्ट अर्थात ई-कचरा निर्माण होत आहे. मात्र पर्यावरणपूरक पद्धतीने याचे निःसारण होत नसल्याचे चित्र सर्वसामान्य आहे !!  अवैज्ञानिक पद्धतींनी ई-कचऱ्याची हाताळणी केल्याने हवा, पाणी आणि मातीचे  प्रदूषण होते आहे , ज्यामुळे मानवी आणि पर्यावरणीय आरोग्यावर परिणाम होतोय. तेव्हा आपण वर्तमान आणि येणाऱ्या पिढीलाही  जबाबदारपणे  ई-कचऱ्याचे  व्यवस्थापन करणे बाबत जागरूक केले पाहिजे,  पर्यावरण संरक्षणाच्या संरक्षणार्थ इलेक्ट्रॉनिक वेस्टचे योग्य पद्धतीने निर्मूलन करण्याची शिस्त बाणविली पाहिजे अशी उद्दिष्ट्ये समोर ठेवून  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून,  Computer Society of India (CSI) नाशिक चॅप्टर.  पूर्णम इकोव्हिजन पुणे  आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी  यांच्या संयुक्त प्रयत्नांतून  "ई-यंत्रण" ही  ई-कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली. 

आमच्या लहान खारींनी या मोहिमेत योगदान दिले !! विशेष कौतुक आहे ते चि. अर्णव पाटील याचे ! या मोहिमे अंतर्गत आपल्या शाळेने, तेथील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी योगदान द्यावे म्हणून अर्णवने चक्क एक निबंध लिहिला आणि शाळेच्या सभेत वाचून दाखविला. त्याला या विषयाचे महत्व चांगलेच समजल्याने, त्याने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिकांशी बोलून शाळेची  ई-कचरा संकलन-केंद्र म्हणून नोंदणी केली आणि नंतर स्वयंसेवक म्हणून कामही केले. 



दुसरी खार राधा !! हिनेही आपल्या निवासी सोसायटीत घरोघरी जाऊन हस्तपत्रिके वाटली  आणि सर्वाना त्याच्या घरातील  इलेक्ट्रॉनिक कचरा द्यायला उद्युक्त केले. 



लहान मुलांनी केलेले कार्य बघून CSI मधील वरिष्ठ अधिकारी, श्री. चंद्रकांत डहाळे म्हणाले, "I am sure both Bill Gates and Steve Jobs ( in his heavenly abode ) would be pleased."

 मुलांचे कौतुक आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा  !!       


अर्णवने लिहिलेला निबंध:  


खारीचा वाटा उचलण्यासाठी तुमचेही स्वागत आहे !  आमचा whastaap ग्रुप जिथे सर्व उपक्रमांची माहिती, आवाहन असते , तो जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वापरा : https://chat.whatsapp.com/Lk73anpEzhHCkcvL1nwutE




No comments:

Post a Comment