Sunday 21 May 2023

मार्च-एप्रिल-मे २०२३ : सीड बॉल्स अर्थात बीजगोळ्यांची निर्मिती



 

नमस्कार ! 

ग्लोबल  वॉर्मिंग आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम बघता, आपलय पृथ्वीची अवसतः  किती नाजुक झालीये हे आपल्याला माहितीच आहे ! म्हणूनच, आपल्याला शक्य असणारे कार्य करतानाच पुढच्या पिढीला त्याबाबत जागरूक करणेही आपलेच काम !   घरात आपण पालकांनी,  पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जगामध्ये काय उपक्रम चालू आहेत या संबंधित, मुलांशी  गप्पा मारलय पाहिजेत ! वेगवेगळे विषय आणि उपक्रम त्यांच्यासमोर मांडले पाहिजेत ! जसे की पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करून कापडी पिशवी वापरणे, माती हवा व पाणी यांचे प्रदूषण करणारे इलेक्ट्रॉनिक वेस्ट हे नेहमीच्या कचऱ्यात न टाकता त्याचा पर्यावरण  पूरक पद्धतीने विल्हेवाट करणाऱ्या संस्थांना देणे आणि हरित पृथ्वीच्या दृष्टीने सीड बॉल्स अर्थात बीजगोळ्यांची निर्मिती करणे  करणे इत्यादी. 

मुलांनाही,  मातीत रमायला आवडतेच ! म्हणून मार्च-एप्रिल-मे  २०२३ या महिन्यांमध्ये आपल्या छोट्या खारींना, सीड बॉल्स अर्थात बियांचे गोळे करण्याविषयी माहिती दिली. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरात आंबे, जांभूळ,फणस  अशी कितीतरी फळे आणली  जातात ज्यातून निघणाऱ्या बियांचे, कोयींचे बॉल्स कसे करावे याविषयी पालकांनी खारींना सांगितले  आणि मुले लागली कामाला !  माती, खत आणि बिया एकत्र करून त्यांनी  विविध फळांचे बीज गोळे तयार केलेत. आणि आता खारी पावसाळ्याची वाट बघत आहेत  !  जरा दमदार पाऊस होऊन गेला की त्यांच्या पावसाळी भटकंतीत हे बीज गोळे डोंगरदर्‍यांमध्ये टाकणार आहेत.  त्यातून नक्कीच काही रोपे तरारतील,वाढतील.  मातीत खेळायला मिळाल्यामुळे, वृक्षारोपणाचा हा सोपा आणि धमाल मार्ग खारींना खूप आवडला. 


या उपक्रमात पुढील खारींनी  सगभाग घेतला !  सारा, ज्ञानश्री, राधा, ओवी, शार्वी आणि शमीक !

      

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सहज करता  येण्यासारखे कितीतरी सोपे उपक्रम आहेत. अगदी एक एकट्याने जरी या युक्त्यांचा वापर केला तरी आपल्या धरती मातेच्या संरक्षणार्थ आपण काहीतरी मोलाची भर नक्कीच घालू शकतो. 

खारीचा वाटा उचलण्यासाठी तुमचेही स्वागत आहे !  आमचा whastaap ग्रुप जिथे सर्व उपक्रमांची माहिती, आवाहन असते , तो जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वापरा : https://chat.whatsapp.com/Lk73anpEzhHCkcvL1nwutE


Thursday 23 February 2023

ई-यंत्रण: ई-कचरा संकलन मोहीम

 

२६ जानेवारी २०२३ !! आजच्या टेक्नो-सॅव्ही जगात,इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल आणि स्मार्ट गॅझेट्सचा वापर आणि खप  प्रचंड प्रमाणात वाढला असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वेस्ट अर्थात ई-कचरा निर्माण होत आहे. मात्र पर्यावरणपूरक पद्धतीने याचे निःसारण होत नसल्याचे चित्र सर्वसामान्य आहे !!  अवैज्ञानिक पद्धतींनी ई-कचऱ्याची हाताळणी केल्याने हवा, पाणी आणि मातीचे  प्रदूषण होते आहे , ज्यामुळे मानवी आणि पर्यावरणीय आरोग्यावर परिणाम होतोय. तेव्हा आपण वर्तमान आणि येणाऱ्या पिढीलाही  जबाबदारपणे  ई-कचऱ्याचे  व्यवस्थापन करणे बाबत जागरूक केले पाहिजे,  पर्यावरण संरक्षणाच्या संरक्षणार्थ इलेक्ट्रॉनिक वेस्टचे योग्य पद्धतीने निर्मूलन करण्याची शिस्त बाणविली पाहिजे अशी उद्दिष्ट्ये समोर ठेवून  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून,  Computer Society of India (CSI) नाशिक चॅप्टर.  पूर्णम इकोव्हिजन पुणे  आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी  यांच्या संयुक्त प्रयत्नांतून  "ई-यंत्रण" ही  ई-कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली. 

आमच्या लहान खारींनी या मोहिमेत योगदान दिले !! विशेष कौतुक आहे ते चि. अर्णव पाटील याचे ! या मोहिमे अंतर्गत आपल्या शाळेने, तेथील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी योगदान द्यावे म्हणून अर्णवने चक्क एक निबंध लिहिला आणि शाळेच्या सभेत वाचून दाखविला. त्याला या विषयाचे महत्व चांगलेच समजल्याने, त्याने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिकांशी बोलून शाळेची  ई-कचरा संकलन-केंद्र म्हणून नोंदणी केली आणि नंतर स्वयंसेवक म्हणून कामही केले. 



दुसरी खार राधा !! हिनेही आपल्या निवासी सोसायटीत घरोघरी जाऊन हस्तपत्रिके वाटली  आणि सर्वाना त्याच्या घरातील  इलेक्ट्रॉनिक कचरा द्यायला उद्युक्त केले. 



लहान मुलांनी केलेले कार्य बघून CSI मधील वरिष्ठ अधिकारी, श्री. चंद्रकांत डहाळे म्हणाले, "I am sure both Bill Gates and Steve Jobs ( in his heavenly abode ) would be pleased."

 मुलांचे कौतुक आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा  !!       


अर्णवने लिहिलेला निबंध:  


खारीचा वाटा उचलण्यासाठी तुमचेही स्वागत आहे !  आमचा whastaap ग्रुप जिथे सर्व उपक्रमांची माहिती, आवाहन असते , तो जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वापरा : https://chat.whatsapp.com/Lk73anpEzhHCkcvL1nwutE




Wednesday 14 December 2022

सदस्य : खारीचा वाटा


 

१२ डिसेम्बर २०२२ पर्यंत 

१) राधा कुलकर्णी

२) ओवी चौगुले 

३) सायुरी कुलकर्णी

४) ज्ञानश्री महाले 

५) नक्षत्रा चौधरी

६) श्रीप्रिया व्याळीज

७) नाथन गाडगीळ 

८) अर्णव पाटील 

९)   अनवी   महाजन     

१०)   सनया तावरे 

१२) सारा वाकदकर

१३) राधा ओढेकर 

१४) कौशल सुराजीवाले

१५)  विप्लव देशमुख  

१६) रुई देवघरे


खारीचा वाटा उचलण्यासाठी तुमचेही स्वागत आहे !  आमचा whastaap ग्रुप जिथे सर्व उपक्रमांची माहिती, आवाहन असते , तो जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वापरा : https://chat.whatsapp.com/Lk73anpEzhHCkcvL1nwutE

Sunday 11 December 2022

मदतकार्य १ उबदार कपड्यांची मदत

मदतकार्य १ उबदार कपड्यांची मदत 

१ ते १० डिसेम्बर २०२२



हिवाळा चालू होता. रस्त्याच्या कडेला, नदीच्या घाटावर कितीतरी लोक अंगाचे मुटकुळे करीत, कुडकुडत झोपतांना दिसत. म्हणून खारींनी ठरविले आपण गरम, उबदार कपड्यांचे संकलन करूयात. सर्व वयोगटाला चालणारे गरम कपडे , चादरी, बेडशीटस्, मोजे, टोप्या इ चे संकलन १ ते १० डिसेम्बर पर्यंत केले.


 आणि ११ डिसेम्बर रोजी चार खारी मिळून गरजुंना हे कपडे देण्याचे मदतकार्य पूर्ण केले.    


पहिलीच वेळ असलयाने, गरजू लोकांपर्यत जाऊन त्यांच्याशी बोलायला खारी सुरुवातीला बिचकतच होत्या. पण जरा, भीड चेपल्यावर त्यांच्या घरात कोणत्या वयोगटाच्या सदस्य आहेत अशी विचारपूस करून, खारींनी उबदार कपड्यांचे , midefully वाटप केले.        





खारीचा वाटा उचलण्यासाठी तुमचेही स्वागत आहे !  आमचा whastaap ग्रुप जिथे सर्व उपक्रमांची माहिती, आवाहन असते , तो जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वापरा : https://chat.whatsapp.com/Lk73anpEzhHCkcvL1nwutE


 


रुजवात : खारीचा वाटा

नासिक वेध 2022 नुकताच राधासह अनुभवला. समाजासाठी किती आणि काय काय करतात तरुण !! गरीब, दिव्यांग, अनाथ यांची परिस्थिती पाहता असे वाटते,  आभाळच फाटले आहे, कुठे कुठे ठिगळ लावणार ! मोठ्या संस्था,व्यक्ती त्यांच्या त्यांच्या परीने कार्य करतच आहेतच! पण आपल्याही मुलांनाही परिस्थिती बदलावविशी वाटते ! "आई, मी काय मदत करू शकते ?" असे प्रश्न तेही विचारतात ! म्हणून मनात विचार आला, उचलू देत त्यांना, त्यांचाही खारीचा वाटा !! 

त्यांच्या वयाला, इच्छेला साजेसे समाजकार्य त्यांनाही करता यावे, म्हणून त्यांना हे खारीचा वाटा चे व्यासपीठ उपलब्ध करून देऊयात असा विचार मनात आला आणि मुलांद्वारेच चालविल्या जाणाऱ्या या संकल्पनेचा जन्म झाला.  

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या IPH वेध गीताचे शब्द आहेत:  "हेतूविना प्रयास, दिशेविना प्रवास, ओटूविना तो उणा प्रत्यक्ष श्वास" !! आणि म्हणून मुलांच्या या खारीच्या वाट्याला काय हेतू आणि दिशा असावी हे स्पष्ट असावे असे वाटले. तिच्याशी चर्चा  करून दोन मूळ हेतू  अथवा उद्देश्य ठरविले १) गरजूंची मदत आणि २) पर्यावरण रक्षण !! 

लागेल ती मदत, मार्गदर्शन गरज पडेल तेव्हा पालक म्हणून करूयात ! विशेष धन्यवाद कु. आयेशा लिमये हिचे, जिने संकल्पना आवडल्यावर लगोलग, सुबकसा आणि साजेसा लोगो यासाठी तयार करून दिला. त्यात, हातात चिखल घेऊन भगवंताला मदत करणारी छोटुकली खार आहे जी आजूबाजूस दिसणारी परिस्थती पाहून, स्वयंप्रेरणेनेच मदतीसाठी तयार झाली !! आपल्या छोट्या खारींची मनेही अशीच संवेदनशील राहोत आणि त्याच स्वयंप्रेरणेने त्यांच्याही हातून चांगले कार्य घडो !!         


खारीचा वाटा उचलण्यासाठी तुमचेही स्वागत आहे !  आमचा whastaap ग्रुप जिथे सर्व उपक्रमांची माहिती, आवाहन असते , तो जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वापरा : https://chat.whatsapp.com/Lk73anpEzhHCkcvL1nwutE